Share

कंगनावर चोरीच्या आरोपांनंतर निर्माते जैन यांनी दिलं स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आगामी ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटात काश्मीरच्या राणी कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. कमल जैन सोबतचा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगनांच्या शौर्याचा साक्षी आपला भारत देश आहे.

अशीच आणखी एक समोर न आलेली वीर कथा म्हणजे काश्मीरच्या राणीची, ज्यांनी महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.’ पण चित्रपटाच्या घोषणेनंतर कंगणावर चोरीचा आरोप झाला आहे. कंगणाने या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ‘दिद्दा’चे लेखक आशिष कौल यांनी केला आहे.

त्यावरच कमल जैन म्हणाले, ज्या महान वीर आण वीरांगणा यांच्या स्टोरीज या 1950 च्या आधीच्या आहेत त्यांच्यावर कॉपीराईट्सची गरज नसते. झाशीच्या राणीवर आम्ही स्टोरी बनवली होती त्यावरही आम्हाला कुठून कॉपीराईट्स घेण्याची गरज नाही पडली. धोनीच्या बायोपिकसाठी आम्ही राईट्स घेतले. कारण ती आजच्या काळातील स्टोरी आहे.

जैन यांच्यानुसार, दिद्दावर आम्ही एक महिन्यापूर्वीच दोन मोठ्या रायटर्सला एक लार्जर दॅन लाईफ स्टोरी लिहायला सांगितली आहे. त्यांची नावंही आम्ही लवकरच घोषित करू. अव्हेंजर्स सीरिजमध्ये ब्लॅक पॅंथरची स्टोरी सर्वात स्ट्राँग आहे. त्यात इंडियन मायथॉलॉजीचीही झलक आहे. आम्ही दिद्दाला ब्लॅक पंथरच्या स्केलपेक्षाही उंच घेऊन जाऊ. बजेट 80 कोटींच्या वर जाऊ शकतं.

एका मुलाखतीत बोलताना आशिष यांनी सांगितलं की, आपल्या अधिकारांसाठी लढणारी कंगना माझ्या सारख्या एका रायटरच्या अधिकारांचा खुलेआम हनन करत नाहीये का. कंगनानं अधिकारांचं उल्लंघन केलं आहे. हे बेकायदेशीर आहे. देशाच्या आयपीआर आणि कॉपीराईट कायद्यांचं पूर्णपणे उल्लंघन आहे. त्यांनी सांगितलं की, काश्मीरची वीरांगणा दिद्दावर त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. याचं प्रकाशन त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते केलं होतं. त्यांचा दावा आहे की, या विषयावर त्यांच्या व्यतिरीक्त कोणीही पुस्तक लिहिलेलं नाही. अशात कोणी त्यावर सिनेमा कसं बनवू शकतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!