Share

औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्गाचा लवकरच सर्व्हे-खा.कराड

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद – औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपचे राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड यांनी औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्गाचा सर्व्हे करणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच औरंगाबाद-बीड या मार्गाचाही सर्व्हे होणार असल्याचे ते म्हणाले.

खा. कराड यांनी रेल्वेमंत्रालयाकडे या दोन्ही मार्गासाठी मागणी करून तिचा पाठपुरावा केला. याची दखल घेत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाच्या सुचना दिल्या आहेत. यानंतर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यानी कराड यांची भेट घेऊन याविषयी माहिती दिली. पुढील 15 दिवसात प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरु होणार असल्याचे मध्य रेल्वेचे उपमुख्य व्यवस्थापक सुरेश जैन यांनी सांगितले.

औरंगाबाद-बीड आणि औरंगाबाद-नगर-पुणे या दोन्ही मार्गाचे सर्वेक्षण पुर्ण झाल्यानंतर दोन्ही मार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद-नगर हा मार्ग पूर्ण केला जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात नगर-पुणे या हा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा आंदाजे खर्च एकुण 1870 कोटी रुपये असणार आहे.

हा नवीन मार्ग झाला तर औरंगाबाद-मनमाड-दौंड-पुणे हे अंतर कमी होईल. तसेच या नवीन मार्गामुळे वाळुज, सुपा, चाकण या औद्योगिक वसाहतींना फायदा होईल. मालवाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग फायदेशीर ठरेल. तसेच औरंगाबाद , वाळुज , गंगापुर, नेवासा, शणिशिगंणापुर, सुपा या शहरांना या मार्गात स्थान मिळेल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!