औरंगाबाद: दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी प्रशासकीय कारण नव्हे तर त्यांच्या साधेपणामुळे चर्चा होत आहे. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील खुलताबाद येथील आठवडी बाजारात केंद्रेकर हे पत्नीसह जाऊन स्वतः बाजार करत असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले.
सुनील केंद्रकर यांचा प्रशासनात दरारा आहे. कडक शिस्त आणि सर्वसामान्यांसाठी बेधडक निर्णय घेत असल्याने त्यांची प्रतिमा लोकप्रिय झाली आहे. कर्तव्यात निभावणारा आणि कामात कसूर न करणारा अशी त्यांची ओळख आहे. मात्र, या सर्वात त्यांचा साधेपणाही अनेक वेळा दिसून आला आहे. शेतकरी कुटुंबातील केंद्रकर यांच्या याच स्वभावाचे दर्शन पुन्हा पाहायला मिळाले. अधिकारी असतानाही कसलाही बडेजाव न करता सर्वसामान्यांसारखे बाजार करताना ते दिसून आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे शनिवारी सकाळी पत्नीसह फेरफटका मारण्यासाठी सुनील केंद्रेकर गेले होते. यावेळी त्यांनी तेथील आठवडी बाजाराला भेट दिली. अत्यंत साधेपणाने त्यांनी थेट पत्नीसह बाजारात भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांनी बाजार केला. हे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या निमित्ताने केंद्रेकर यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत आहे’
- मातंग समाजाच्या आरक्षणासाठी दलित महासंघाच्या वतीने होणार राज्यभर आंदोलन
- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे?
- ‘महाजेनको’ निर्मिती संचालकपदाच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करा- भाजपा
- औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्गाचा लवकरच सर्व्हे-खा.कराड


