🕒 1 min read
मुंबई:- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.
या सर्व घडामोडींमुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट निर्माण होत आहे. भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी याच महिलेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने आपल्याला देखील ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच आता हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे हे माझे मित्र नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय मदतीसाठी धावून जाण्याचा प्रश्नच नाही, असं भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्पष्ट केलं आहे. रेणू शर्मा प्रकरण हे पॉलिटिक्समधील पहिलं मीटू प्रकरण असल्याचा दावाही हेगडे यांनी केला आहे. रेणू शर्मा हिच्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी आज मीडियाशी संवाद साधला. मुंडे प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे त्यावर मला फारसं भाष्य करायचं नाही, असंही हेगडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत आहे’
- मातंग समाजाच्या आरक्षणासाठी दलित महासंघाच्या वतीने होणार राज्यभर आंदोलन
- ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे?
- ‘महाजेनको’ निर्मिती संचालकपदाच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करा- भाजपा
- औरंगाबाद-पुणे रेल्वे मार्गाचा लवकरच सर्व्हे-खा.कराड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
