🕒 1 min read
मुंबई – मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA नं गुरुवारी सकाळीच एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली आहे. अँटिलियाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचं प्रकरण आणि त्यानंतर घडलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण याची चौकशी एनआयएकडून सुरू आहे. याच संदर्भात एनआयएनं प्रदीप शर्मा यांच्या घरावर सकाळीच छापा टाकला होता. तेव्हापासूच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तसेच, याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा हे मित्र आहेत. याचबरोबर, या प्रकरणात नुकतीच एनआयएने संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा प्रदीप शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचे बोलले जाते, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही एनआयएने चौकशीला बोलावले होते.
प्रदीप शर्मा कोण आहेत ?
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत. प्रदीप शर्मा हे १९८३ साली पोलीस सेवेत रुजू झाले होते. अल्पावधीतच त्यांनी एन्काऊंटर स्पेशलीस्ट अशी त्यांनी आपली ओळख बनवली. एक दोन नव्हे तर तब्बल ३१२ गुंडांचा त्यांनी एन्काऊंटर केला आहे.
दरम्यान, प्रदीप शर्मा यांच्या अनेक गंभीर आरोप यापूर्वी देखील झाले आहेत. अनेक कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचा देखील आरोप आहे. काही आरोप झाल्यानंतर २००८ साली त्याचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते मात्र २०१७ साली त्यांना क्लीन चीट देण्यात आली. यानंतर त्यांनी २०१७ साली त्यांनी दाऊदच्या भावाला अटक केली.२०१९ साली त्यांनी आपला राजीनामा देवून नालासोपारा इथून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारमध्ये चाललंय काय ? भुजबळ -राऊत झाले आक्रमक,भाजपला होणार फायदा ?
- ‘हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका’
- नामांकित कंपनीच्या नावाने बनावट मास्क विक्री करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल
- ‘अरे हा तर फारूख शेख’ ; हिमेशचा जुना फोटो पाहून नेटकऱ्यांनी दिली प्रतिक्रिया
- सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया ? शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
