Share

विद्यार्थ्यांची माथी भडकवणारा ‘हिंदुस्थानी भाऊ’ नेमका आहे तरी कोण? जाणून घ्या सर्वकाही!

Published On: 

🕒 1 min read

सोशल मीडियावर कमी वेळात कोण, कसे, कुठे आणि किती प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. मुंबईतील असाच एक तरुण सुरुवातीला सोशल मीडियावरुन विविध पोस्ट करून लोकांच्या चर्चेत आला. आपल्या आगळ्या-वेगळ्या बोलण्याच्या पद्धतीने सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला. हा तरुण आपले टोपण नाव ‘हिंदुस्तानी भाऊ’ म्हणून वापरतो. पण आता राज्यात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे भाऊ चर्चेत आला. विद्यार्थ्यांची माथी भडकवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हिंदुस्तानी भाऊला अटक होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हा ‘हिंदुस्तानी भाऊ’ कोण आहे, हे जाणून घेऊया.

हिंदुस्तानी भाऊ म्हणून ओळख असलेल्या भाऊचे नाव विकास फाटक आहे. काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर भाऊ चर्चेत आला. भाऊने पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने पाकिस्तानचा आपल्या शिवराळ भाषेत खरपूस समाचार घेतला होता. तसेच भारतातून पाकिस्तानला सहाय्य करणाऱ्या व पाकिस्तानची बाजू घेणाऱ्यांना देखील भाऊ ने ‘पहेली फुरसत मे निकल’ हा आपला खास टोला लगावला. त्या एका वाक्याने भाऊला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. भाऊचे आज इंस्टाग्राम अकाऊंट वर ५० लाख चाहते आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांवरून भाऊ सतत चर्चेत असतात.

ऑगस्ट २०२० मध्ये हिंदू देव-देवतांची मस्करी करणाऱ्यांना मारा, असे आव्हान या भाऊने आपल्या व्हिडिओमधून केले होते. म्हणून त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट स्थगित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर हास्य कलाकार कुणाल कामरा याने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे भाऊवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

जून २०२० मध्ये एकता कपूरच्या XXX2 या वेब सीरिज विरोधात खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. आपल्या वेब सीरिजमध्ये एकता कपूर यांनी भारतीय सैनिकांचा अनादर केल्याचा आरोप त्याने ठेवला होता. तसेच एकता कपूर यांनी जनतेची जाहीर माफी मागावी व आपला पद्मश्री पुरस्कार परत करावा, असे आव्हान देखील त्याने केले होते. अल्ट बालाजी या संकेतस्थळावर भारतीय सेनेच्या जवानांच्या गणवेशाचा वापर करत जवानांचा आणि देशाचा अनादर केल्याप्रकरणी एकता, शोभा कपूर आणि जितेंद्र कपूर यांच्या विरोधात मुंबई दंडाधिकारी न्यायालयात गुन्हा दाखल केला होता.

मे २०२१ मध्ये जमावबंदी आणि ताळेबंदीच्या काळात भाऊने फिल्मी स्टाइल मारत एका रुग्णवाहिकेत येऊन शिवाजी पार्क, दादर येथे परीक्षा घेतल्या जाऊ नयेत म्हणून निदर्शन केली. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

आज (३१ जानेवारी) रोजी विकास फाटक (हिंदुस्तानी भाऊ) याने आपल्या युट्यूब चॅनलवरुन परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांच्या जीवासोबत खेळू नका असा संदेश देणार व्हीडीओ प्रसिद्ध केला आणि त्यावरून मुंबई, उस्मानाबाद, औरंगाबाद, नगपूरसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. याविरोधात भाऊचा शोध सुरू असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे.

वैयक्तिक माहिती-

हिंदुस्तानी भाऊ सध्या मुंबईतील खार येथे रहातो. भाऊचे प्राथमिक शिक्षण सेंट अँड्रीव हायस्कूल, वांद्रे येथे झाले. ७ वी इयत्तेत शाळा सोडून भाऊ कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोटी मोटी कामे करू लागला. सुरुवातीच्या काळात भाऊ खार जिमखान्यात नोकरी करत होता. तिथे त्याला दिवसाला २० रुपये मिळायचे.

‘बिग बॉस’च्या १३ पर्वात देखील सहभाग-

भाऊचा विवाह झाला असून त्याला आदित्य नावाचा मुलगा देखील आहे. भाऊ काही काळासाठी मुंबईच्या ‘दक्ष पोलीस न्यूज’ या वर्तमानपत्रासाठी पत्रकार म्हणून कार्यरत होता. २०११ साली त्याला ‘सर्वोत्तम मुख्य गुन्हेविभाग पत्रकार’ पुरस्कार देखील मिळाला होता. हिंदी मालिका बिग बॉस च्या १३ व्या पर्वात तो सहभागी झाला होता.

भाऊ म्हणजेच विकास फाटक सध्या संकल्प युवा प्रतिष्ठानचा सभासद असून ‘आदित्य युवा प्रतिष्ठान’ या त्याच्या मुलाच्या नावाने अशासकीय संस्था (NGO) चालवतो आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!