Share

परभणी भाजपचा वाईन विक्रीस विरोध; निषेधाच्या निवेदनासह दिल्या चक्क वाईनच्या बॉटल भेट..!

Published On: 

परभणी: राज्यात आता किराणा दुकानांमध्ये वाईन मिळणार आहे. या बाबतचा प्रस्ताव २८ जानेवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडला आहे. त्यामुळे आता वाईन घेणे अगदी सोप्पे झाले आहे. या निर्णयाच्या विरोधात सोमवारी (दि.३१) परभणी भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे(Anand Bharose) यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर(Mahesh Wadadkar) यांना निषेधाच्या निवेदनासह वाईनच्या बॉटल देण्यात आल्या.

राज्य शासनाने किराणा दुकान व सुपर मार्केट मधून वाईन विकण्यास परवानगी दिल्यानंतर त्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. वाईन विक्रीला विरोध करत भाजपने राज्यभरात आंदोलने सुरु केली आहेत. आज परभणी येथे ही राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात आंदोलन करून निषेधाचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, महाराष्ट्र राज्य सरकारने २७ जानेवारी मंत्रीमंडळ बैठकीत एक हजार फुटापेक्षा मोठी असलेली किराणे दुकाने, सुपर मार्केट मधून वाईन विक्रीस परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. किराणा दुकान, सुपर मार्केट मधून खुलेआम वाइन विक्री होणार असेल तर त्याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम तरुण वर्गावर पडणार आहेत. अशा या निर्णयामुळे व्यसनाधीश होणाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. परभणी जिल्ह्यातील किराणा मर्चंट असोसिएशनने पण या निर्णयास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित हा वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!