मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी हायकोर्टात आज सुनावणी घेण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयने 15 दिवसात प्राथमिक चौकशी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनी देखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने असं सांगितलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची शक्यता कमी असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येत आहे.
मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. निर्णय देताना न्यायालयाने सांगितलं की, ‘जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत त्यामुळे असामान्य स्थिती म्हणून सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले जात आहेत. प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचा की नाही याचा निर्णय सीबीआयने घ्यावा’.
यानंतर याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सदर आदेश दिले आहेत. यानंतर, अनिल देशमुख ही मोघलाई नाही. कितीही धमक्या दिल्या तरी मागे हटणार नाही, असे खुले आव्हान जयश्री पाटील यांनी दिले आहे.इकडे तुमचे राज्य नसून संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. फक्त माझीच याचिका उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी घेतली. न्यायायाने माझे खूप कौतुक केले. कोणीतरी एक शूर आहे, जे एवढ्या मोठ्या १०० कोटींच्या प्रकरणात समोर आले, असे न्यायालयाने म्हटल्याची माहिती माहिती जयश्री पाटील यांनी दिली.
जयश्री पाटील कोण आहेत ?
अॅड. जयश्री पाटील या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत. जयश्री पाटील यांनी कायद्यात पीएच.डी केली आहे. राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिलं त्यांनी मानवाधिकारांबाबत काही पुस्तकं लिहिली आहेत. गंभीर आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे जयश्री पाटील यांनी तक्रारही दाखल केली होती.
महत्वाच्या बातम्या
- नटराजन, शार्दूल नंतर आता मोहम्मद सिराजला मिळली एसयूव्ही थार
- उपचारात हलगर्जीपणा केल्यास खैर नाही, आ. मेघना बोर्डीकर यांचा सज्जड इशारा
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या,मुंबई उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

