Share

पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ४९ हजारांहून वर गेल्याने सरकार देखील कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे.

या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ‘राज्यात पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसून शनिवारी, रविवारी (१०-११ एप्रिल) म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात येईल. तर ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात येतील. राज्यात उद्यापासून रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, मॉल, रेस्टॉरंट, बार हे बंद राहतील. मात्र, होम डिलीव्हरी सुरु असेल. तर, , निम्म्या क्षमतेने सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहेत. याबाबत लवकरच सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली असून निर्बंधांबाबत आजच नियमावली जाहीर करण्यात येईल व उद्या रात्री आठ वाजल्या पासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत.

असे आहेत नियम

उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार

मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार

सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाणार

राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.

सर्व बांधकामे सुरु राहतील

सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार

भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील

शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार.

राज्यातील चित्रपटगृहे बंद राहणार

सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक

50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

वीकेंड लॉकडाऊन कसा असेल ?

शुक्रवार 9 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून सोमवार 12 एप्रिल सकाळी सात वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन करण्यात येईल. केवळ अत्यावश्यक सेवा आणि परिवहन सेवा सुरु राहतील. याबाबत लवकरच सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येईल. सोमवार ते शुक्रवार पर्यंत राज्य सरकारच्या नियमावलीनुसार काही गोष्टी सुरु राहणार आहेत. मात्र शनिवार आणि रविवार कठोर निर्बंध असणार आहेत. विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!