Share

लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार

Published On: 

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. दुसरीकडे, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रविवारी ४९ हजारांहून वर गेल्याने सरकार देखील कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे.

या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ‘राज्यात पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसून शनिवारी, रविवारी (१०-११ एप्रिल) म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात येईल. तर ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात येतील. राज्यात उद्यापासून रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, मॉल, रेस्टॉरंट, बार हे बंद राहतील. मात्र, होम डिलीव्हरी सुरु असेल.

तर, , निम्म्या क्षमतेने सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहेत. याबाबत लवकरच सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली असून निर्बंधांबाबत आजच नियमावली जाहीर करण्यात येईल व उद्या रात्री आठ वाजल्या पासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत.

सध्या नागरिकांना महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? लागणार तर कधी? असे प्रश्न भेडसावत आहेत यामुळे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आव्हान केले आहे. ‘गेल्या वेळी पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन लावला आणि मजूर अडकले. आम्हाला यावेळी तसं होऊ द्यायचं नाही. महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीच तर नागरिकांना दोन दिवसांचा वेळ देऊ,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!