🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत कसोटी कसोटी मालिकेत भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय होता. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर उद्योगपती आनंद महिंद्रा जाम खूश झाले होते. त्यांनी भारतीय टीममधील सहा तरुण खेळाडूंना महिंद्रा थार SUV देण्याची घोषणा केली होती.
आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलियाला धूळ चारून भारतात येताच टीम इंडियाच्या सहा तरुण खेळाडूंना आपल्या कंपनीची ढासू ऑफ रोडर एसयूव्ही THAR गिफ्ट म्हणून देत असल्याचे जाहीर केले होते. महिंद्रांनी मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल आणि नवदिप सैनी या सहा खेळाडूंना थार गिफ्ट देणार होते. ही एसयूव्ही टीम इंडियाच्या तरुण खेळाडूंना गिफ्ट करताना मला खूप आनंद होत असल्याचे महिंद्रा म्हणाले होते.
https://www.instagram.com/p/CNPJgmVjvXM/?utm_source=ig_web_copy_link
भारतातील मोठे व्यावसायिक असलेल्या आनंद महिंद्रा यांनी आपले वचन पूर्ण करत शार्दूल ठाकूर, टी नटराजन नंतर आता मोहम्मद सिराजला एसयूव्ही THAR गिफ्ट केली आहे. मोहम्मद सिराजने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आनंद महिंद्रा यांना धन्यवाद म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एका धावेनं अर्धशतक हुकलं ; झेलबाद करणाऱ्या फिल्डरला बॅटने मारहाण
- कॉंग्रेस-शिवसेनेच्या वादाचा नवा अध्याय, आता कॉंग्रेसने केले थेट आदित्य ठाकरेंनाच टार्गेट
- ‘जनहितासाठी पाठिंबा, पण किमान राज्य सरकारने ‘या’ प्रश्नांची उत्तरे तरी द्यावीत’
- अक्षय कुमारच्या तब्येतीत बिघाड ; पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल
- मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख कोरोना पॉझिटिव्ह
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
