परभणी : राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. पण काही ठिकाणी आरोग्य यंत्रणेत कामचुकारपणा पाहायला मिळत आहे. हे होऊ नये म्हणून आ.मेघना बोर्डीकर यांनी यंत्रणेची कां उघाडणी केली. शहरातील शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार करावेत. जे डॉक्टर व कर्मचारी कामामध्ये निष्काळजीपणा करतील अशांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आ. बोर्डीकर यांनी दिला.
या आढावा बैठकीत आ.बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात कोरोना रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कोरोनाचे रुग्ण संख्या अशीच वाढत गेली तर रुग्णांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत का? नसेल तर त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जिल्ह्यात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रुग्णालयातील कामकाजाविषयी नाराजी व्यक्त करीत कामामध्ये सुधारणा कराव्यात. तसेच विविध उपाययोजना संदर्भात सूचना दिल्या.
सध्या परभणीत पुरेसे बेड उपलब्ध असले तरी नियमित ऑक्सीजन पुरवठा होण्यात अडचणी येत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आली. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. या सर्व समस्यांच्या सोडवणूकीसाठी आपण मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्ह्यात कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आ.मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारने मध्यम मार्ग काढला; भाजप नेत्याने केले निर्णयाचे स्वागत
- मुख्यमंत्रीसाहेब, जनतेच सोडा आधी मंत्र्यांना आवर घाला; जयंत पाटलांच्या दौऱ्यात नियमांना तिलांजली
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

