Share

एका महिलेच्या व्यक्तीगत आयुष्याचा माध्यमांपुढे सार्वजनिक बाजार मांडण्याचा अधिकार नवाब भाईंना कोणी दिला?

Published On: 

मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री नवाब मलिक रोज नवनवीन आरोप करत आहेत. शिवाय मलिक हे समीर यांच्या पत्नी तथा अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावरही निशाणा साधत आहे. यावर क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर देत मलिक यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात उडी घेत थेट क्रांती रेडकर यांनाच इशारा दिला आहे. ‘अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर त्यांचा इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है’ अशी धमकी आव्हाड यांनी दिलीये. या सर्व घडामोडीनंतर आता भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ या या घडामोडींवर भाष्य करत सरकारला धारेवर धरले आहे.

त्या म्हणाल्या, महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक जी हे खुलेआम एका महिलेच्या कौटुंबिक विषयाबाबत सर्व माध्यमांपुढे नाहक बदनामी करातायेत. मौलाना खरं बोलतोय की तिच्या जवळ असलेले सरकारी कागदपत्र याची शहानिशा न्यायालयीन प्रक्रीयेतच होऊ शकते. पण तीच्या व्यक्तीगत आयुष्याचा माध्यमांपुढे सार्वजनिक बाजार मांडण्याचा अधिकार नवाब भाईंना कोणी दिला?

साध्या ट्विटवर गुन्हा दाखल करणारे मुख्यमंत्री आज उघडपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का आहेत? हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ज्या कॅांग्रेसी प्रवृत्तीने डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता, ती कॅांग्रेसी प्रवृत्ती जेव्हा जेव्हा सत्तेवर येते तेंव्हा तेंव्हा दलित आणि शोषितांवर अन्यायच होतात असा घणाघात देखील वाघ यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!