🕒 1 min read
मुंबई: कोरोनाच्या नवनवीन ‘स्ट्रेन’चा जसा सगळय़ांनी धसका घेतला आहे तसा हवामान बदलाच्या ‘स्ट्रेन’चाही घ्यावा लागेल. निसर्ग इशारे देत आहे. जागतिक हवामान संस्था, इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंजसारख्या संघटना त्याची जाणीव करून देत आहेत. सरकार आणि समाज दोघांनीही हा धोका समजून घेत जागे व्हायला हवे. अन्यथा, नैसर्गिक आपत्तींचा धुमाकूळ होतच राहील.असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातून दिला आहे.
मान्सून हा नेहमीच लहरी असला तरी या वर्षी हवामान बदलाचा मान्सूनवर झालेला परिणाम तीक्र स्वरूपाचा होता . यंदाच्या पावसाळ्यात हिंदुस्थानात मान्सून आणि चक्रीवादळे असा ‘ खो – खो ‘ पाहायला मिळाला . ‘ तौकते ‘ आणि ‘ गुलाब ‘ या दोन चक्रीवादळांच्या मध्ये पाऊस असा मान्सूनचा एक नवीन ‘ स्ट्रेन ‘ या वर्षी दिसला . कमी दाबाचा पट्टा , त्यानंतर चक्रीवादळ आणि पाठोपाठ तुफान पावसाचा तडाखा असे चक्र दिसले . हवामान बदलांचा हा नवा ‘ स्ट्रेन ‘ आपल्यासाठी नक्कीच घातक आहे . निसर्ग इशारे देत आहे . सरकार आणि समाज दोघांनीही हा धोका समजून घेत जागे व्हायला हवे . अन्यथा , नैसर्गिक आपत्तींचा धुमाकूळ होतच राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
मान्सूनच्या लहरीपणाचा अनुभव आपल्या देशाला नवीन नाही. अलीकडील काही दशकांत या लहरीपणाला हवामानातील बदलांची, ग्लोबल वॉर्मिंगची जोड मिळाली आहे. त्यामुळे अनियमित आणि अनिर्बंध पाऊस हे आपल्या मान्सूनचे वैशिष्टय़ झाले आहे. याही वर्षी त्यापेक्षा वेगळे काही घडले नाही. अगदी परतीच्या मान्सूननेदेखील महाराष्ट्रासह केरळ, तामीळनाडू आणि उत्तरेतील राज्यांना जाताजाता महापुराचे तडाखे दिलेच. केरळमध्ये तर गेल्या आठवडय़ात तुफान पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान 35 जणांचा बळी गेला. शेती, घरे आणि इतर स्थावर मालमत्तेचे नुकसान झाले ते वेगळेच. मागील काही वर्षांपासून लहरी मान्सून आणि नैसर्गिक आपत्तींचे शुक्लकाष्ठच देशाच्या मागे लागले असल्याचेही सामनातून राऊत यांनी म्हटले आहे.
2020 मध्ये हवामान बदलाचा जो तडाखा बसला त्यात हिंदुस्थानचे सुमारे 65 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. मुळात हिंदुस्थानपुरता विचार केला तर मागील काही वर्षांत निसर्गाचे चक्रच बदलून गेले आहे. मान्सूनचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. मान्सूनचे आगमन वेळेवर झाले तरी नंतर पावसाचे वेळापत्रक बिघडलेलेच असते. महिन्याची सरासरी दोन-तीन दिवसांतच भरून काढण्याची सवयच वरुणराजाला लागली आहे. यंदा तर महापुराचे न भूतो असे तडाखे वेगवेगळ्या भागांना बसले. त्यात एकापाठोपाठ एक अशी चक्रीवादळे गेल्या दोन-चार वर्षांत देशावर आदळत आहेत. महाराष्ट्रालाही त्याचे तडाखे बसले आहेत. त्यामुळे पिकांचे आणि स्थावर मालमत्तांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. 2021 मध्येही हेच चित्र कायम राहिले. एरवी सप्टेंबरमध्ये विश्रांती घेणाऱया मान्सूनने यंदा ऑक्टोबरमध्येही धुमाकूळ घातला. मान्सूनचे उशिरा परतणे आणि कमी दाबाचे पट्टे निर्माण होणे यामुळे या वर्षी अनेक राज्यांमध्ये जलसंकट उद्भवले. जागतिक हवामान संस्थेच्या अहवालाने याच गंभीर मुद्द्यावर बोट ठेवले असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी अगोदरच जागृत होण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस फसवणूकीची परंपरा चालवतात, भाजपचे आमदार, खासदारही त्यांच्यासारखेच’
- नवाब मलिकांच्या टीकांना आळा घालावा; न्यायालयात जनहित याचिका दाखल
- पोटनिवडणुकीच्या विजयानंतर फटाके फोडायला चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही येणार- उदय सामंत
- बॉलिवूडचे बदनामीकारक चित्र रंगवलं जातंय; मुख्यमंत्री पाठवणार मोदींना पत्र
- ‘इंडस्ट्रीमधील सगळ्यांची मुले एकदा तरी तुरुंगात जातील’; मिका सिंगने व्यक्त केला संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
