मुंबई : झी मराठी या वाहिनीवर स्वराज्य रक्षक संभाजी राजे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आणि या मालिकेतून छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे हे राज्याच्या घराघरात पोहचले. उत्कृष्ट वक्ता म्हणून देखील त्यांची ओळख आहे. मात्र सध्या अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी अमोल कोल्हे यांनी एक निर्णय घेतला आहे.
https://www.instagram.com/p/CVhVYUmNfkU/?utm_source=ig_web_copy_link
अमोल कोल्हे यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘इन्स्टाग्रामवर नजर टाकताना अनेकदा निदर्शनास आलं की पोस्टवर प्रतिक्रिया देताना ‘अभिनेता’ की ‘नेता’ अशी अनेकांची गल्लत होते. राजकीय भूमिका प्रत्येकाची वेगळी असू शकते पण ती भूमिका पडद्यावरील, समाजमाध्यमावरील भूमिकेच्या आड येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळेच एक निर्णय घेतला आहे, इन्स्टाग्रामवर इथे राजकीय पोस्ट करायची नाही. म्हणजे कन्फ्युजन नको. राजकीय पोस्टसाठी फेसबुक पेज आहेच. चालेल ना?’. तसेच पुढे ‘जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून मांडलेल्या विचाराला राजकीय भूमिका समजण्यात येऊ नये,’ त्यांनी टीप देखील दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदार संघातून लोकसभेची निवडणूक जिंकली. 2019 मध्ये महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 4 खासदार निवडून आले. सध्या ते सोनी मराठी या वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत देखील अमोल कोल्हे सर्वाना दिसले.
महत्त्वाच्या बातम्या
- टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘सरकार आणि समाजाने हवामानाचा धोका समजून घ्यावा अन्यथा…’,’सामना’तून राऊतांचा इशारा
- मोदी कायद्यापेक्षा मोठे नाहीत; पेगाससवरून कॉंग्रेसचा टोला
- किरण गोसावीला अटक करण्यात पुणे पोलीस यशस्वी
- ‘..तर मी राजीनामा तर देईलच पण राजकारणातून संन्यासही घेईल’ : नवाब मलिक


