मुंबई: टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी यांनी बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या उपस्थितीत काम्या पंजाबी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.
काम्या पंजाबी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. मात्र त्यांना व्यस्त वेळापत्रकामुळे तसे करता आले नाही. मात्र, आता तिचा ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ हा शो संपल्याने अखेर त्यांनीकाल बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबी अनेक यशस्वी टीव्ही शोचा भाग आहेत. बिग बॉस सीझन 7 मध्येही त्या दिसल्या आहेत. बिग बॉस सीझन-7 मधील काम्या यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना म्हटले आहे की, जेव्हा काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना जनतेवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवताना पाहते, त्यावेळी मला त्यांच्यासारखे काम करावेसे वाटत असल्याने मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फडणवीस फसवणूकीची परंपरा चालवतात, भाजपचे आमदार, खासदारही त्यांच्यासारखेच’
- नवाब मलिकांच्या टीकांना आळा घालावा; न्यायालयात जनहित याचिका दाखल
- पोटनिवडणुकीच्या विजयानंतर फटाके फोडायला चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही येणार- उदय सामंत
- बॉलिवूडचे बदनामीकारक चित्र रंगवलं जातंय; मुख्यमंत्री पाठवणार मोदींना पत्र
- ‘इंडस्ट्रीमधील सगळ्यांची मुले एकदा तरी तुरुंगात जातील’; मिका सिंगने व्यक्त केला संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

