नवी दिल्ली: पेगासस प्रकरणावरून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर निशाना साधत टीका केली आहे. पेगॅसस तंत्रज्ञानाचा गैरवापर करून देशातील लोकांचे फोन हॅक करणे व त्यांच्यावर पाळत ठेवणे हा अभिव्यक्तिस्वांतत्र्यावरील गदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने कॉंग्रेसचे म्हणणे स्वीकार केले आहे. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान यावरूनच पंतप्रधान मोदी कायद्यापेक्षा मोठे नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली आहे. पेगॅससचा वापर, पेगॅससचे सॉफ्टवेअर कोणी खरेदी केले आणि पेगॅसस विदा (डाटा) अन्य देशाकडेही आहे का, असे प्रश्न संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने विचारले होते. पण, एकाही प्रश्नाचे उत्तर मोदी सरकारने दिले नसल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान काँग्रेसने केलेल्या सर्व आरोपांची दखल हायकोर्टाने घेतली आहे. त्यामुळे मोदी कायद्यापेक्षा मोठे नाहीत अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘सरकार आणि समाजाने हवामानाचा धोका समजून घ्यावा अन्यथा…’,’सामना’तून राऊतांचा इशारा
- पोटनिवडणुकीच्या विजयानंतर फटाके फोडायला चव्हाणांसोबत मुख्यमंत्रीही येणार- उदय सामंत
- बॉलिवूडचे बदनामीकारक चित्र रंगवलं जातंय; मुख्यमंत्री पाठवणार मोदींना पत्र
- ‘इंडस्ट्रीमधील सगळ्यांची मुले एकदा तरी तुरुंगात जातील’; मिका सिंगने व्यक्त केला संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

