Share

‘तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी; मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊन वर्ष उलटून गेले. महाविकास आघाडी सरकार  सत्तेत आल्यानंतर फडणवीस सरकारच्या अनेक निर्णयांना केराची टोपली दाखवली आली आहे. आरे कारशेड, जलयुक्त शिवार योजना, हायपरलूप प्रकल्प व शिक्षक बदली अशा अनेक निर्णयांना ठाकरे सरकारकडून स्थगिती मिळाली आहे तर काही निर्णय बदलण्यात देखील आले आहेत.

दरम्यान, मंत्र्यांच्या विदेशवारीवर होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी खर्चांवर निर्बंध आणण्याचा फडणवीस सरकारने घेतलेला निर्णयही विद्यमान सरकारने स्थगित केला आहे. यावर भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चांवर आणल्याचा हवाला देत फडणवीसांच्या निर्णयाला ठाकरे सरकारने स्थगिती दिल्याचं वृत्त अतुल भातखळकर यांनी शेअर केले आहे.

‘मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेले निर्बंध मुख्यमंत्री ठाकरे यांनी रद्द केले. थोडक्यात, तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी आहे. मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही असं ट्विट करत भातखळकर यांनी सरकावर तोफ डागली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!