वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अमेरिकन नागिरक भव्या लाल यांची अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी (1 फेब्रुवारी) नासाने याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
भव्या लाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या नासासाठी परिवर्तन संबंधित समीक्षा दलाच्या सदस्य आहेत. बायडन सरकारच्या अंतर्गत प्रशासनातील बदलाशी संबंधित कामांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.
नासा संस्थेत उच्च पदावरील नियुक्ती केल्या आहेत. भव्या लाल या संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी नियुक्त करण्यात येत आहेत. फिलीप थॉम्पसन व्हाईट हाऊसचे समन्वयक, मार्क एटकिंड संस्थेच्या ऑफिस ऑफ कम्युनिकेशनमध्ये सहायक प्रशासक आणि जॅक मॅकगिनस यांना प्रेस सचिव या पदांवर नियुक्त करण्यात आलं आहे. त्याशिवाय एलिसिया ब्राऊन आणि रिगन हंटर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती नासाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भव्या लाल यांनी व्हाईट हाऊस कार्यालयातील ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी, नॅशनल स्पेस काऊंसिल, नासा, संरक्षण मंत्रालय आणि इंटेलिजन्स कम्युनिटीसाठी अंतराळ तंत्रज्ञान, धोरण विश्लेषण या विषयांचं नेतृत्व केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन आर्थिक वर्षासाठी २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर; १०० कोटींची अतिरीक्त मागणी
- पॉपस्टार रीहानाच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटला माजी क्रिकेटपटूचे प्रतिउत्तर !
- काकांनी आता निवृत्त व्हावे; पुतणे आशिष यांचा अनिल देशमुखांना घरचा आहेर
- ‘एल्गार परिषदेच्या आडून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव’
- अत्याचार पीडितेची ओळख सांगू नका, औरंगाबाद खंडपीठाचे माध्यमांना निर्देश


