Share

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची गय करणार नाही – पोलिस आयुक्त निखील गुप्ता

Published On: 

औरंगाबाद : रूग्णांचे प्राण वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय करणार नाही असे आश्वासन पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी शहरातील डॉक्टरांना दिले आहे. पोलिस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी  शहरातील वैद्यकीय व्यावसायीकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत डॉक्टरांना येणाऱ्या विविध अडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांच्या संकल्पनेतून अ कप ऑफ टी विथ युवर सीपी ही मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून मंगळवारी शहरातील प्रतिष्ठीत वैद्यकीय व्यवसायीकांची बैठक पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात पार पडली. पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस विशेष शाखेचे सहाय्यक आयुक्त अशोक बनकर, विशेष शाखेचे निरीक्षक प्रमोद खटाणे, मराठवाडा डॉक्टर असोसिएशनचे डॉ.हिमांशु गुप्ता, एमजीएमचे डॉ.प्रविण सुर्यवंशी, हेडगेवार हॉस्पीटलचे डॉ.प्रविण ठाकरे, माणिक हॉस्पीटलचे डॉ.प्रमोद लोणीकर, बजाज हॉस्पीटलच्या डॉ.नताशा वर्मा, सिग्मा हॉस्पीटलचे डॉ.उन्मेष टाकळकर, एशियन हॉस्पीटलचे डॉ.शोएब हाश्मी, एमआयटी हॉस्पीटलचे डॉ.संतोष ढाकणे आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी डॉक्टरांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉक्टरांच्या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येईल असे आश्वासन पोलिस आयुक्तांनी उपस्थितांना दिले. तसेच सतत कामाच्या व्यस्ततेमुळे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना विविध प्रकारचे दुर्धर आजार जडले आहेत. दुर्धर आजारी असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाईल असे आश्वासन मराठवाडा डॉक्टर असोसिएशनचे डॉ.हिमांशु गुप्ता यांनी पोलिस आयुक्तांना दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!