Share

संजय राऊत नेमके कोणाचे प्रवक्ते आहेत ते जाहीर करावं; नाना पटोलेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत शिवसेनेकडून विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील यूपीएचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावे, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केले होते.

दरम्यान,याच मुद्द्यावरून आता कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. काँग्रेसने मात्र राऊत यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत नेमके कुणाचे प्रवक्ते आहेत हे त्यांनी जाहीर करावं, अशी मागणी केली आहे.

नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिवसेना हा यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएने कुणाला पाठिंबा द्यावा हे ते ठरवू शकत नाही. त्यांनी सल्ले देऊ नयेत असं सांगतानाच संजय राऊत कोणाचे प्रवक्ते आहेत ते आधी त्यांनी जाहीर करावं, मग आम्ही त्यावर बोलू, असं पटोले म्हणाले.

याचसोबत युपीएच्या अध्यक्ष पदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिलेच सांगितले आहे की, अध्यक्ष बदलण्याची कुठलीही चर्चा किंवा परिस्थिती सध्या नाही आहे. त्यामुळे यावर शिवसेने आपली प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. महाराष्ट्रात कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत काँग्रेसने शिवसेनेला महाराष्ट्रात पाठिंबा दिला आहे. हे त्यांनी यूपीएचा भाग नसल्यामुळे या संदर्भात कुठलेही भाष्य करणे गरजेचे नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!