🕒 1 min read
नवी दिल्ली :उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. रिप्ड जीन्स संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यांचे हे वक्तव्य कोणालाही न पटणारे होते. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून महिलांनी संताप व्यक्त केला गेला. महिला वापरत असलेल्या जीन्सबाबात त्यांनी आक्षेप घेतला होता. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत’असं तीरथ सिंह रावत यांनी म्हटलं होत
यावेळी जया बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेलीनेही या विधानावर आपले रोकठोक मत व्यक्त केले होते. तसेच सर्वच स्तरातून त्यांच्या वर टीका करण्यात आल्यानंतर आता यावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया आली आहे. स्मृती इराणीदेखील या विधानावरुन तीरथ सिंह यांच्यावर भडकल्या आहेत.
स्मृती इराणी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या रिप्ड जिन्सबाबतच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, की लोकांनी कशाप्रकराचे कपडे घालावेत याच्यासोबत नेत्यांचं काही घेणं देणं नाही. कारण त्यांचं काम धोरण बनविणे आणि कायद्याचे राज्य सुनिश्चित करणे हे आहे. पुढे बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, की काही गोष्टी पवित्र आहेत आणि त्यातीलच एक आहे महिलांनी आपलं जीवन जगण्याची पद्धत निवडणं आणि समाजासोबत जोडण्यासाठी ती जो प्रकार निवडेल तो पवित्रच आहे. नेत्यांचा या गोष्टीसोबत काहीही संबंध नाही की लोक कसे कपडे घालतात. काय खातात किंवा काय करतात. आपलं काम धोरण बनवणं आणि कायद्याचं शासन सुनिश्चित करणं आहे. अनेक नेते चुकीचे वक्तव्य करत असतात, असंही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
