Share

संजय राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी नेमके कोण आहेत?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनात शिवसेना पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सीबीआय आणि आयटीच्या धाडीवरुन हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी एक नाव घेतले. ते म्हणजे जितेंद्र चंद्रलाल नवलानी.(Jitendra Chandralal Navlani) यांच्यावर अनेक आरोप राऊत यांनी केले.

नेमके संजय राऊत काय म्हणाले?

जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीचे वसुली अधिकारी म्हणून काम करत आहेत. ना सध्या दिल्लीत पदोन्नती मिळाली आहे. जितेंद्र नवलानी हे ७ कंपन्याचे संचालक असून त्यांनी या सात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी शेकडो कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. नोव्हेंबर २०२१ मध्ये आयकर विभागाने नवलानी आणि त्यांच्या पत्नीला बेनामी संपत्तीप्रकरणी नोटीसही पाठवली होती. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

जितेंद्र नवलानी आणि किरीट सोमय्या यांचा काय संबंध?

जितेंद्र नवलानी यांच्या सात कंपन्यामध्ये करोडो रूपये ट्रान्सपर केले जातात. है सर्व पैसे दिल्ली मुंबईत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी ट्रान्सपर केले जातात. मात्र याच्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे? सोमय्यांनी हे स्पष्ट करावं. असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे. तसेच आज आम्ही जितेंद्र नवनाली आणि रॅकेट विरोधात खंडणीची तक्रार दाखल करणार असून या प्रकरण्याच्या चौकशीनंतर ईडीचे काही अधिकारी तुरूगांत जातील. असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!