Share

Aditya Thackeray | व्हिप आमचाच, त्यामुळे गद्दारांना तिथे बसण्याचा अधिकार नाही – आदित्य ठाकरे

Published On: 

मुंबई : राज्यातील विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. हे शिंदे-फडणवीस सरकारचे पहिलेच अधिवेशन आहे. दरम्यान शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. व्हिप आमचाच आहे म्हणजे शिवसेनेचा, त्यामुळे गद्दारांना तिथे बसण्याचा अधिकार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले “आज आम्ही सदन प्रस्ताव मांडला, पण तो मंजूर झाला नाही. हे सरकार लोकशाही विरोधी सरकार आहे. बेईमानांचे सरकार आहे. शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न राज्यात आहे. मात्र यांचे फक्त राजकारण सरु आहे. त्यामुळे यांना जनतेचा आवाज जात नाही.”

व्हिप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे-आदित्य ठाकरे 

“हे घटनेच्या विरोधात काम करत आहेत. जर आपण कायद्यात बघितले तर व्हिप हा शिवसेनेचा म्हणजे आमचाच आहे. हे जे ४० गद्दार आहेत. यांचा ना व्हिप आहे, ना तिथे बसण्याचा नैतिक अधिकार आहे. पक्षाची कारवाई चालू राहते”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

वरळी सर्वांना आवडायला लागली आहे-

वरळी मतदार संघात भाजप दहीहंडी साजरी करणार आहे, यावर आदित्य ठाकरे म्हणाले. चांगली गोष्ट आहे. “वरळी सर्वांना आवडायला लागली आहे. प्रत्येकाने तिथे उत्सव साजरे करावे, आम्ही कुठेही चॅलेंज करणार नाही. आम्ही पोरकटपणा करणार नाही. सगळ्यांनी सण साजरा करवा, आणि राजकारण आणू नये ही आमची भावणा आहे.”

मंत्रिमडळात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळले-

आदित्य ठाकरे म्हणाले, “मंत्रिमडळात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळले आहे. अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. खऱ्या सत्ताधारी गद्दार सोडून, ज्या चांगल्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!