🕒 1 min read
Mohit Kamboj । मुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या कारवायांमुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक बडे नेते सध्या ईडीच्या निशाण्यावर आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील ईडी कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांना ईडीने १ नोव्हेंबरला रात्री उशिरा अटक केली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनीही फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत. अशात भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे.
मोहित कंबोज यांच्या ट्विटने राजकारणात मोठी खळबळ उडाली असून चर्चेला उधान आले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार,” असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे. तसेच “मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. यामुळे, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
Save This Tweet :-
One NCP Big – Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) August 16, 2022
यानंतर आता तिसरा नेता कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. कंबोज सुचवू पाहणारे ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते’ प्रफुल्ल पटेलच असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । खातेवाटपानंतर चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार यांची अवस्था केविलवाणी झालीय; शिवसेनेची खोचक टीका
- Shivsena । शिंदे गटाचे अस्वल झाले व दरवेशी श्री. फडणवीस महोदय आहेत; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल
- Vinayak Mete | मेटेंच्या जाण्याने चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व गेलं – हर्षवर्धन पाटील
- Ajit Pawar | सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, अजित पवारांची राज्य सरकारवर टीका
- Vinayak Mete | विनायक मेटेंचा घातपातच?, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

