Share

Amol Mitkari । मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का? त्याचीच आधी चौकशी करा; अमोल मिटकरी आक्रमक

Published On: 

Amol Mitkari । मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील ईडी कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांना ईडीने १ नोव्हेंबरला रात्री उशिरा अटक केली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनीही फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. हे दोघेही सध्या तुरुंगात आहेत. अशात भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचा आणखीन एक बडा नेता जेल मध्ये जाणार असल्याचं भाकीत केलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक होत कंबोजांवर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी म्हणाले कि, मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसरा आहे. हा भाजपाचा भोंगा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाही, असा सवाल करत मोहित कंबोजचीदेखील चौकशी झाली पाहिजे. ईडी कुठे धाड टाकत आहे, हे जर त्याला माहीत असेल तर मग त्याची चौकशी झाली पाहिजे. मोहित कंबोज हा ईडीचा चौकीदार आहे का, असा संतप्त सवाल करत त्याच्या चौकशीची मागणी मिटकरी यांनी केली. मिटकरीनंतर आता राष्ट्रवादीतून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरवात होणार आहे.

ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले मोहित कंबोज ?

ट्विटमध्ये मोहित कंबोज म्हणाले कि, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकर नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना भेटणार,” असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे. तसेच “मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, यामुळे, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार का? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. सध्या राष्ट्रावादीतील काही नेत्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचीही सीजे हाऊसमधील पुनर्बांधणी प्रकरणी चौकशी सुरू आहे. पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. कंबोज सुचवू पाहणारे ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते’ प्रफुल्ल पटेलच असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!