Share

“सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Udhav Thackrey) मानेच्या आजारामुळे त्रस्त आहेत, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. यासह राज्यातील कोरोना संकट, शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत, विविध परीक्षा घोटाळा, शेतकरी कर्जमाफी, मंत्र्यांच्या भ्रष्टाचारांच्या तक्रारी यावरुन रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

याबाबत सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘सध्याच्या महाराष्ट्राचा वाली कोणी आहे का? मुख्यमंत्री ( कुठे आहे माहीत नाही), बाकी मंत्री (घोटाळ्यात व्यस्त), अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’, असा सवाल सदाभाऊंनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासोबत बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेवर भाष्य केले आहे, ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा,’ असे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!