औरंगाबाद : शहरात खुलेआम रस्त्यावर एका कपलचा किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. जालना रोडवर रात्रीच्या वेळी हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. क्षणिक आनंदासाठी एका कपलने चक्क चालू बाईकवर किस केला होता. सदरील तरुणाला औरंगाबाद शहर जिन्सी पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे नाव सुरज कांबळे (वय २४) असून तो बीड बायपास परिसरातील अशोकनगर येथील रहिवाशी आहे.
३१ डिसेंबर रोजी रात्री सुरज कांबळे याला त्याच्या मित्रांनी चॅलेंज दिलं होत. म्हणून तो स्टंट केल्याचे त्याने पोलिसांसमोर कबुल केलं आहे. औरंगाबादेतील कबीर सिंग म्हणून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच किस करतानाचा हा खतरनाक स्टंट जीवावर देखील बेतला असता. त्यामुळे नेटकऱ्यांनी संबंधित तरुणावर कारवाईची मागणी केली होती. शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे असे स्टंट अपघाताला निमंत्रण ठरू शकतात. अशी टीका सोशल मिडीयावर झाल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव आला होता.
https://www.facebook.com/watch/?v=634481541136166&t=10
शहरातील आकाशवाणी चौकातून सेव्हन हिलकडे जाणाऱ्या एका कारमधून हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक कपल जिवाची पर्वा न करता प्रेमात बुडून गेल्याचे दिसत आहे. किस करताना औरंगाबादेतील हा कबीर सिंग बाईक देखील चालवत आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनाथांची माय अनाथ करून गेली…! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन
- सिंधूताई जेव्हा मुख्यमंत्र्यांना प्रोत्साहन देतात, “केवढी आव्हानं रे तुझ्यासमोर लेकरा..”
- आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती- मुख्यमंत्री ठाकरे
- बाळ धनंजय… म्हणून माझ्या कार्याची पोहोच पावती देणाऱ्या माईंच्या निधनाने व्यथित झालो-धनंजय मुंडे
- “मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचं त्याला…”, विरोधकांना उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर


