मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून यावर तीव्र संताप व्यक्त होत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही राणेंचा निषेध व्यक्त करत नाराजी दर्शविली आहे.
यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री असा की बादशहा असा, कायदेशीर कारवाई होणारच असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर तुम्ही २५ वर्ष ज्या शाळेत शिकलात ती शाळा अजून अबाधित आहे आहे असं देखील राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर नारायण राणे यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, नाशिक शहराचे शिवसेनेचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर नारायण राणेंविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढले आहेत. सध्या नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. काल रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला, तसेच मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांची जीभही घसरली. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात नाशिक आणि महाडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पोलीस खात्यातील काही लोक सरकारने बस म्हटलं की लोटांगण घालतायत’
- “हिंदुत्वाशी गद्दारी करुन मुख्यमंत्रिपद मिळवलं”; नारायण राणे पुन्हा बरसले
- ‘नारायण राणे छक्का है, नारायण राणे भडवा है!’, संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी
- ‘माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन’, नारायण राणेंची वृत्तवाहिन्यांना धमकी
- ‘…अन्यथा पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करायला बसू’ ; फडणवीसांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

