पुणे : मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीच वर्ष कशाला ठेवलं? तेव्हा कुठे गेला होता मराठी माणूस? आणि आता कोर्ट सांगत आहे की, त्यांनी काहीच केलं नाही, असा टोला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे.
बहुचर्चित असणाऱ्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात आहेत. समीर वानखेडे याची बाजू घेणाऱ्या भाजपला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी चांगलेच फटकारले. याबाबत वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठी माणसाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
समीर वानखेडे यांच्या आई लाडाने त्याच्या वडिलांना दाऊद हाक मारायच्या, यावरही भुजबळ यांनी मिश्किल शब्दात टिप्पणी केली आहे. भुजबळ म्हणाले की, मी पहिल्यांदा ऐकलं की लाडाने दाऊद म्हणतात, आमच्याकडे अहो जा हो, मुन्नू, टून्नू, अशी हाक मारतात. या संपूर्ण प्रकरणात रेड खरी होती का?, तसेच समीर वानखेडे यांनी जातीचे आरक्षण घेऊन भारत सरकारला फसवलं आहे का? या सगळ्या बाबी तपासात समोर येतीलच. नवाब मलिक पुराव्यासह सर्व गोष्टी समोर आणताहेत. त्यामुळे सत्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या तुषार भोसलेची गाढवावरून धिंड काढणार’, राष्ट्रवादीचा इशारा
- ‘बॉलिवूड’ला बदनाम करून ‘यूपीवूड’ कधीच तयार होणार नाही- नवाब मलिक
- भाजपचं पितळ उघडं पाडण्याच्या भाषेऐवजी करा ना काय करायचे ते; चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- ‘होय मी भंगारवाल्याची मुलगी’, मलिकांच्या मुलीने ट्वीट करत दिले टीकाकारांना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

