Share

‘शरद पवारांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या तुषार भोसलेची गाढवावरून धिंड काढणार’, राष्ट्रवादीचा इशारा

Published On: 

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी बुधवारी सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचे तीव्र पडसाद उमटले. गुरुवारी (दि. २८) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भोसले यांच्या घरी गेले असता ते घरी नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शादाब सय्यद यांच्या नेतृत्वाखाली तक्रार देण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष गणेश गायधनी म्हणाले की, तुषार भासले हा इसम सातत्याने डिजिटल माध्यमांवर चर्चेत राहण्यासाठी आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते त्याची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही. पोलिस ठाण्यात गणेश गायधनी, योगेश निसाळ, निखिल भागवत, विनायक कांडेकर, सचिन झोले, वजाहत शेख, माजी नगरसेवक हरीश भडांगे, प्रज्योत सुरवाडकर, भीमराव सातपुते, अजय जाधव, राहुल तुपे आदींनी पोलिसांकडे तक्रार केली. वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, शरद पवार यांचेवरील टीकेप्रकरणी तुषार भोसले यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा त्यांना नाशिक शहरात फिरू न देण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिला आहे. भोसले यांच्याविरोधात पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार दिली असल्याचे खैरे यांनी सांगितले. भोसले यांच्या घरी समन्स गेल्यानंतर ते भीतीपोटी बाहेरगावी पळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!