Share

‘बॉलिवूड’ला बदनाम करून ‘यूपीवूड’ कधीच तयार होणार नाही- नवाब मलिक

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलत असतांना एनसीबीने 2 ऑक्टोबरला कॉर्टेलिया क्रूजवर टाकलेल्या छाप्यातून आर्यन खानसह एकूण 8 जणांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना अटक देखील करण्यात आली. मात्र, कॉर्टेलिया क्रूजवर झालेल्या या पार्टीचं आयोजन करणाऱ्या काशिफ खानला समीर वानखेडेंनी अटक केली नाही, असा आरोप त्यांनी केला.

बॉलिवूडला बदनाम करून यूपीवूड कधीच तयार होणार नाही. तसा प्रयत्न केला तर ती तुमची घोडचूक ठरेल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावलं आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडबाबतची चर्चा रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच सुनावले आहे. बॉलिवूडला बदनाम केल्याने यूपीवूड तयार होईल असं योगी महाराजांना वाटत असेल तर ती त्यांची घोडचूक आहे, अशी टीका मलिकांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील गंगा किनाऱ्यावरील लोक इथे आले, त्यांना बॉलिवूडने ओळख दिली. गुजरातमधून आलेल्यांना बॉलिवूडनेच ओळख दिली. महाराष्ट्रातील लोकांनाही ओळख दिली. तामिळनाडूतून आलेल्यांनाही ओळख दिली. मुंबई ही मिनी भारत आहे. या बॉलिवूडला बदनाम करून उत्तर प्रदेशात नेऊन यूपीवूड तयार करू असं ज्यांना वाटतं त्याचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असं मलिक म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!