पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.
नवाब मलिक कौटुंबिक कारणामुळं चुकीचे आरोप करत आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला. मलिक यांनी वैयक्तिक कारणासांठी महाराष्ट्राला वेठीस धरु नये, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडं गृह खातं असून त्यांनी भाजपचं पितळ उघडं पाडण्याचं वक्तव्य करण्याऐवजी काय करायचे ते करावं, असं आव्हान चंद्रशेकर बावनकुळे यांनी नवाब मलिक आणि राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे.
भाजपचे पितळ उघडं पाडण्याची भाषा करणा-यांचे सरकार दोन वर्षापासुन राज्यात आहे करा ना काय करायचे ते तुमच्या हातात तपास यंत्रणा आहे गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे वाट कशाची पहाता, असा सवाल बावनकुळे यांनी नबाब मलिकांना आव्हान दिलं आहे. नबाब मलिकांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाल्याच्या रागातून ते चुकीची माहिती पसरवत आहेत. नवीन पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून काढण्याचे सोडून कारवाई करणा-या आधिका-यांना वैयक्तिक पातळीवर टार्गेट केलं जातंय, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. राज्य सरकारचा दुरपयोग केला जातो.
नबाब मलिकांच्या जावयावर ड्रग्ज प्रकरणात कारवाई झाल्याने मलिक फस्टट्रेशनमध्ये जाऊन बोलत असल्याचा गंभीर आरोप माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.बावनकुळे पुण्यातील आंबेगाव तालुक्याच्या दौ-यावर आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आजही आहे, इथं कोणावर अन्याय होणार नाही- संजय राऊत
- ‘होय मी भंगारवाल्याची मुलगी’, मलिकांच्या मुलीने ट्वीट करत दिले टीकाकारांना प्रत्युत्तर
- ज्याने इतरांना जेलमध्ये टाकलं त्याच्या मागे आता कोर्ट कचेऱ्या लागतील- छगन भुजबळ
- ‘शिवसेनेने विश्वासघात केल्यामुळे काँग्रेस पक्षाला राज्यात सत्तेची लॉटरी लागली’
- ‘काँग्रेसचे नेते दरोडेखोर नसतात पण राष्ट्रवादीवर भरोसा नाही, आम्ही त्यांच्या सलगीला भूलणार नाही’


