🕒 1 min read
मुंबई : भाजपा नेते मोहित कम्बोत यांच्या १०० कोटींच्या खटल्यावर उत्तर देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मी भंगारवाला आहे , असे वक्तव्य केले होते. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतांना या शहरात जेवढे भंगार आहेत, त्यांचे एकएक नट बोल्ट काढून भट्टीत टाकणार आहे आणि यांचे पाणी केल्याशिवाय थांबणार नाही असा इशाराही मालिकांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर मलिकांची मुलगी सना मलिकनेही एक ट्विट केले आहे.
‘होय मी भंगारवाल्याची मुलगी! मला अभिमान आहे. मी मराठी मुलगी,’असे ट्वीट करत त्यांनी वडिलांना पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी #NawabMalikMyHero हा हॅशटॅगदेखील त्यांनी वापरला आहे.
होय मी भंगारवाल्याची मुलगी!
मला अभिमान आहे.
मी मराठी मूलगी.#NawabMalikMyHero pic.twitter.com/Zan8j7taQk— Sana Malik-Shaikh ثنا ملک-شیخ सना मलिक-शेख (@sanamalikshaikh) October 29, 2021
दरम्यान, मलिक यांना कम्बोत यांच्याकडून १०० कोटींचा खटला दाखल करण्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, ‘माझी तर औकात इतकी नाही. माझा ब्रॅण्ड त्यांनी १०० कोटींचा केला आहे. सगळं विकलं तरी माझ्याकडे १०० कोटी नाहीत. ते सांगतात भंगारवाले…पण भंगारवाला काय असतो. होय मी भंगारवाला आहे. माझे वडील कपडे आणि भंगारचा व्यवसाय केला. वयाच्या १६ व्या वर्षापासून ते राजकारणात आमदार होण्यापर्यंत मी भंगारचा व्यवसाय करत होतो. शेजारीच आमचं दुकान आहे, जाताना त्याचे फोटोही काढा. माझे कुटुंब भंगारचा व्यवसाय करतं याचा अभिमान आहे’, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- बीड जिल्ह्यात २४ तासांत २ शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या
- अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या घरी ईडीची छापेमारी
- ’24 तास आर्यन खानच्या बातम्या देणारे मुख्यमंत्र्याला आणि परिवहन मंत्र्याला जाब विचारायला तयार नाहीत’
- इंडिज-बांगलादेश संघांत आज होणार लढत; आव्हान टिकविण्यासाठी विजय अनिवार्य
- ‘समीर वानखेडे मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
