जळगाव : राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन नुकतंच एक वर्ष झालं. अस असलं तरी या सरकारमधील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या कुरबुरी संपण्याचे नाव घेत नाही. निधी मिळत नाही ते निर्णयप्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही या काँग्रेसच्या तक्रारी अजून संपल्या नाहीत. यातच सोनिया गांधी यांनी लिहलेले पत्र सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनलं आहे.
या पत्राचा विषय राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या विकासाबाबत कारवाई करावी असा आहे. या पत्राचा हेतू अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी नाराजी व्यक्त करण्याबाबत असला तरी काँग्रेसच्या नाराजीची योग्य दखल शिवसेना आणि राष्ट्रवादी घेत नसल्यामुळेच हे पत्र आणि दिल्लीतील पत्रकार परिषदेचा हेतू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार दलित, आदिवासी आणि वंचित समूहाच्या विरोधातील असल्याचं मी इतक्या दिवसांपासून सांगत होतो. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्याची पोचपावतीच दिली आहे, असं सांगतानाच आता तरी सरकारमधील काँग्रेस मंत्र्यांनी सत्तेसाठीची लाचारी झुगारून आपल्या समाजबांधवांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा,’ असं आवाहन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं.
पडळकरांच्या या टीकेला महाविकास आघाडीत घटकपक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सोनिया गांधी यांनी ठाकरे सरकारला अल्पसंख्यांक समाजाविषयी पत्र लिहून मानवता जोपासली आहे. कुठे हिमालय आणि कुठे मुतखडा,’ अशा शब्दांत त्यांनी पडळकरांची खिल्लीच उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकांमधील आघाडीबाबत सुप्रिया सुळे म्हणतात…
- किसान सभेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकऱ्यांची उद्या दिल्लीकडे कूच!
- ‘मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ठाकरेंनी मोदींना फोन केला होता, मग कांजूरमार्गसाठी का करत नाहीत?’
- तिढा सुटणार? मेट्रो कारशेडप्रकरणी शरद पवार करणार मध्यस्थी!
- शाहिनबागसह शेतकरी आंदोलनात दिसणाऱ्या ‘त्या’ आज्जीवर कंगनाची टीका; आता आज्जीनं दिलं सडेतोड उत्तर


