मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. आता, भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
राज्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस ता तीन पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.
याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवण्याबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ घेतील. महापालिका निवडणूक कशी लढवायची याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,’ असं त्या म्हणाल्या आहेत.
दरम्यान, औरंगाबाद पाठोपाठ आता मुंबई महापालिकांमध्ये देखील काँग्रेस स्वबळाने लढण्यास उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस मुंबईचे नवे अध्यक्ष भाई जगताप यांच्या पाठोपाठ नव्याने मुंबई काँग्रेसच्या प्रचार समिती प्रमुखपदी निवड झालेल्या नसीम खान यांनी देखील स्वबळाचा नारा दिला आहे.
‘युतीबाबत आमचा कोणताही निर्णय अजून झालेला नाही. सद्याची युती ही फक्त महाराष्ट्रातील सरकार चालवण्यासाठीची आहे. यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्रॅमचा आधार घेण्यात आला आहे. काँग्रेसचे अनेक नेते, पदाधिकारी सगळ्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस स्वबळावर लढली पाहिजे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे.’ असं सांगत नसीम खान यांनी काँग्रेस स्वबळावर लढेल याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे म्हणतात…कोरोनाची लस आली तरी तब्बल ‘इतके’ महिने मास्क बंधनकारकच
- महाविकास आघाडीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस; जगतापांचा स्वबळाचा नारा तर गायकवाड म्हणतात…
- ‘मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी ठाकरेंनी मोदींना फोन केला होता, मग कांजूरमार्गसाठी का करत नाहीत?’
- सर्वसामान्यांचा प्रवास होणार आणखी सुरक्षित; स्वस्त गाड्यांमध्येही असणार ‘ही’ सुविधा
- शाहिनबागसह शेतकरी आंदोलनात दिसणाऱ्या ‘त्या’ आज्जीवर कंगनाची टीका; आता आज्जीनं दिलं सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

