Share

तिढा सुटणार? मेट्रो कारशेडप्रकरणी शरद पवार करणार मध्यस्थी!

Published On: 

मुंबई : पुन्हा एकदा मेट्रो कारशेडचा प्रश्न तापला आहे. फडणवीस सरकारच्या याकाळात आरेमध्ये कारशेड करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र पर्यावरणप्रेमींसह स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेतला.

ही जमीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असून सद्या हा प्रश्न उच्च न्यायालयात गेला आहे. उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली असून या प्रकल्पाचा खर्च वाढत आहे. तर, दुसरीकडं मेट्रोच्या कामास देखील विलंब होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, हा संघर्ष सुरु असतानाच मेट्रो कारशेडप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मध्यस्थी करणार असल्याचं समजत आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली आहे. पवार म्हणाले याबद्दल कुठे तरी एकोपा निर्माण करायला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले जर वाद सोडून यावर मार्ग निघाला तर बघायला हवा. याबाबत शरद पवार प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर एकदोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील. मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री देखील प्रयत्न करत असून यात पवार मध्यस्थी करत असल्याची’ माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

पवार साहेब अहवाल वाचल्यानंतर योग्य निर्णय घेतील – फडणवीस

‘हा विषय प्रतिष्ठेचा नसून जेव्हा शरद पवार उच्चाधिकार समितीचा अहवाल वाचतील तेव्हा ते सुद्धा आरेमधील जमिनीचा विचार करतील. ते व्यावहारिक बाजू बघतात. त्यामुळे पवार साहेब अहवाल वाचल्यानंतर योग्य निर्णय घेतील,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!