Share

जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा ‘हा’ खेळाडू अडकणार विवाहबंधनात

Published On: 

अहमदाबाद: ज्याप्रमाणे बॉलीवूड कलाकार आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे काही तरी गुप्त योजना असल्याच्या चर्चा असतात त्याच प्रमाणे क्रिकेटर्स च्या देख्हील जीवनाबद्दल माध्यामांमध्ये चर्चा असतात आता देखील अशीच एका खेळाडूच्या सुट्टी दरम्यान एक बातमी आली आहे. आता भारतीय संघातील आणखी एका मोठ्या खेळाडूचा विवाह होणार आहे.

यामध्ये काही जण गुपचूप लग्न उरकून घेतात तर काही मोठ्या थाटामाटात लग्न करतात. विराट कोहली, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, आर.आश्विन यांचा लग्नसोहळा म्हणजे चाहत्यांसाठी एक आकर्षण होतं. आपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह आता लवकरचं लग्नबंधनात अडकणार आहे.

यासाठी इंग्लंंड विरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याआधी बुमराहने अचानक बीसीसीआयकडे सुट्टीसाठी अर्ज केला आहे. बुमराह लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यासाठी त्याने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे, अशी माहिती क्रिकट्रॅकरने दिली आहे.

मात्र, बुमराहच्या जीवनसाथीचं नाव अद्याप समोर आलं नाही. अधिकृतपणे या लग्नसोहळ्याची माहिती देखील दिली गेलेली नाही. याॅर्करच्या दिग्गजाची विकेट कोणी काढली अश्या चर्चा बुमराहच्या चाहत्यांमध्ये देखील रंगल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंड विरूद्धच्या चार टेस्टच्या मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. जागतिक टेस्ट चाॅम्पियनशीपची फायनल खेळण्यासाठी भारताला पुढचा सामना जिंकावा किंवा ड्राॅ करावा लागेल. त्यानंतर न्यूझीलंडशी सामना दोन हात करायची संधी मिळू शकते. त्यामुळे जसप्रीत बुमराहसारखा खेळाडू संघाबाहेर असल्याने भारतीय संघाची चिंता वाढू शकते.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!