मुंबई : देशात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला. यामुळे शेतकऱ्यांपासून ते सर्वच स्तरातील नागरिक हे आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
अशातच, सामान्यांच्या खिशावरील आर्थिक ताण वाढत असून तेलापासून ते पेट्रोल-डिझेलपर्यंत मोठ्या प्रमाणात भाववाढ केली जात आहे. मागील काही महिन्यांपर्यंत शंभरीच्या दारात गेलेल्या पेट्रोलच्या किंमती देशातील पश्चिम बंगाल, केरळसह ५ राज्यांच्या निवडणुकांच्या काळात काहीशा कमी झाल्याचं दिसून आलं. मात्र, आता पुन्हा एकदा पेट्रोलमध्ये दररोज वाढ होत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली असून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या 40 वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा 2020-21 या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन/जीडीपी) उणे (-) 7.3 टक्के नोंदवला गेलाय.
नोटबंदी करताना मोदींजींनी नोटबंदी चे दूरगामी परिणाम होतील असे सांगितले होते…
"जीडीपी" ची पाताळाकडे वाटचाल..!! @ -7.3
●कुठे नेऊन ठेवला रे देश माझा
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) June 2, 2021
यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. मोदी सरकारच्या ७ व्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसने विविध ठिकाणी आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध केला होता. आता जीडीपीच्या मुद्द्यावरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपच्या २०१४ सालच्या निवडणुकीमध्ये वापरलेल्या प्रचाराच्या वाक्याच्या स्टाईलचा उपयोग करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘नोटबंदी करताना मोदींजींनी नोटबंदी चे दूरगामी परिणाम होतील असे सांगितले होते…आता “जीडीपी” ची पाताळाकडे वाटचाल..!! @ -7.3. कुठे नेऊन ठेवला रे देश माझा?’ असा सवाल भाई गजतप यांनी ट्विटद्वारे उपस्थित केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- एकवेळ केंद्रातलं सरकार पडेल पण महाराष्ट्रातील सरकार पडणार नाही; पटोलेंच फडणवीसांना प्रत्युत्तर
- ‘डिसेंबरपूर्वी सर्वांचे लसीकरण, ही मोदी सरकारची लबाडीच’ ; ममता दीदींचा घणाघात
- पवारांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाहीये; आरक्षण रद्द होण्यास पवारच जबाबदार – पडळकर
- राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव ; ठाकरे सरकार उद्या निर्णय घेण्याची शक्यता
- आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांच्या खात्यात राज्य सरकार ५ लाख रुपये जमा करणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

