मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक दिवसांपूर्वी अपशब्द काढले होते. त्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात भारतीय जनता पक्षाने तक्रार दाखल केली. याचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. या घटनेला पाच वर्षे झाली. त्यावेळी तुम्ही झोपला होता का?, असा सवाल राऊतांनी केला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून मुंबईत दाखल झाले. त्यांनी विमानतळावरच माध्यमांशी संवाद साधला. ‘कुणी काय म्हटलं मला माहीत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. तोपर्यंत तुम्ही झोपले होते का? तेव्हा ते विधान आक्षेपहार्य वाटलं नव्हतं का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ते विधान का केलं? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी ते विधान केलं. भाजपला महाराजांचा अवमान आवडला असेल तर ठिक आहे. आम्हाला नाही चांगलं वाटलं म्हणून आम्ही त्यावर बोललो. चपला घालून महाराजांना कुणी हार घालत नाही. हा आमचा रितीरिवाज आणि परंपरा आहे. महाराजांबद्दलचा आदर आहे. भाजपमध्ये जे लोक नवे गेले आहे त्यांना तसं वाटत असेल तर ठिक आहे, तसं जाहीर करावं, असंही राऊत म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही असे नारायण राणे बुधवारी म्हणाले होते. त्यावर राऊत यांनी भाष्य केले. ‘काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असे म्हणत कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही. आमच्याकडे कामं आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही’, संजय राऊतांनी राणेंना डिवचले
- १२ आमदारांचा वाद निकाली लागणार? मुख्यमंत्री ठाकरे, अजित पवार आज राज्यपालांच्या भेटीला
- ‘एखाद्याने पंतप्रधान मोदींच्या कानशीलात वाजवेल असे म्हटले तर मग…?’, संजय राऊतांचा सवाल
- दिल्लीत मोठ्या घडामोडी? नारायण राणेंवरील कारवाईची ‘चाणक्य’ अमित शाह यांच्याकडून दखल
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

