मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात राणेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे. सुनावणीदरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याची आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे.
दरम्यान राणेंच्या वक्तव्यावरूनच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजप विरुद्ध शिवसेना असं संघर्ष यावेळी पाहायला मिळाला. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात तीव्र स्वरुपात टीका केली. तर काल २५ ऑगस्टरोजी राणे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी शिवसेनेला चांगलेच सुनावले आहे.
तर आज मंत्री राणे यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची जन आशीर्वाद यात्रा पुढे होणार का, यावरही प्रश्न केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीत मोठ्या घडामोडी? नारायण राणेंवरील कारवाईची ‘चाणक्य’ अमित शाह यांच्याकडून दखल
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- ‘ज्याला आपला बाप कोण हेच माहित नाही त्या लावारीस संजय राऊतला काय किंमत द्यायची’, नितेश राणेंची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
