Share

‘जालन्यात काँग्रेस पक्ष टिकवणाऱ्या आ.कैलास गोरंट्याल यांना मंत्री करा’, समर्थकांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

जालना : राज्याची विधानसभा सध्या अध्यक्षाविना आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हापासून विधानसभा अध्यक्षपद खाली आहे. तसेच शिवसेना नेते संजय राठोड यांनाही एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यामुळे आजमितीला राज्यातील दोन मंत्रिपदे रिक्त आहे.

यामुळे राज्यात बरेच दिवसांपासून मंत्रीमंडळात बदल घडवून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच काँग्रेस पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. गोरंट्याल हे जालना मतदारसंघातून तिसऱ्यांदा काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. परंतु कैलास गोरंट्याल हे पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले. पण विधानसभा निवडणुक निकालानंतर राज्यात तीन पक्षाचे सरकार आले आणि या सरकार मध्ये काँग्रेस पक्ष पक्ष सत्तेत सहभागी झाला. पण सर्व मंत्रिपदे ही काँग्रेसच्या हायकंमाड जवळील व्यक्तिनांच भेटले.

यामुळे राज्यातील काँग्रेस पक्षातील अनेक आमदार नाराज झाले. ही नाराजगी त्यांनी बोलवून ही दाखवली. परंतु त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली. परंतू आता मंत्रिमंडळ विस्तार करण्याची चर्चा असताना कैलास गोरंट्याल यांचे समर्थक मंत्रिपदाची मागणी करत आहे. गोरंट्याल हे जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार आहे. जालना जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे संघटन नसताना वैयक्तिक प्रभावाच्या जोरावर तिसऱ्यांदा ते निवडून आले आहे.

कैलास गोरंट्याल यांनी खुप विपरीत परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे जालना जिल्ह्यात संघटन टिकवून ठेवले आहे. कोणत्याही घराणेशाहीचा आधार नसताना काँग्रेस संघटनेत आणि जिल्ह्यात आपलं नेतृत्व घडवले आहे. जालना जिल्ह्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी संघटन ताकद आहे. तरीही कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षाला एकहाती दिशा देण्याचं काम केले आहे. यामुळेच जालना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्याच्या पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली आहे की जर काँग्रेस पक्षाला जालना जिल्ह्यात संघटन टिकवून ठेवायचे असेल तर गोरंट्याल यांना मंत्रिपद देणे आवश्यक असल्याचे समर्थक सांगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!