अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांनी ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये अकोले तालुक्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळत असून, तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. ऑक्सिजन, औषधे, किट यांचा तुटवडा आहे.
अकोले तालुक्यात कोरोनाने थैमान घातलेले असताना लोकप्रतिनिधी कुठे आहेत, त्यांनी आता बाहेर पडून जनतेच्या समस्या सोडविल्या पाहिजेत, असे मत माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त करत त्यांनी आ.किरण लहामटे यांच्यावर निशाणा साधला आहे.
वैभव पिचड म्हणाले की, अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून कोरोना चाचणीसाठी लागणारे किट उपलब्ध नाही. पूर्वी याठिकाणी कार्डियाक रुग्णवाहिका होत्या. परंतु अशा महामारीच्या काळात त्याही दुसरीकडे हलविल्या आहेत. शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने राबविण्यासाठी योग्य ती पावले उचलावी लागतात व त्यात लोकप्रतिनिधी कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. असा आरोप पिचड यांनी केला आहे.
तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. सरकार व प्रशासन याबाबत कमी पडत आहे,
तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी खानापूर येथे नेले जाते. परंतु खानापूर हे उपचार केंद्र नसून केवळ रुग्णांना दाखल करण्याचे ठिकाण आहे. अशी टीकाही पिचड यांनी केली. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अकोले व्यापारी संघटनेने १४ सप्टेंबर पासून आठ दिवस जनता कर्फ्यु लागू करून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही पिचड यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या:-
- मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढता येत नाही- श्रीहरी अणे
- संसदेने भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभं रहायला हवं-पंतप्रधान नरेंद्र मोदी
- कोणाचा बॅंड वाजतो तर कोणाचा ब्रॅंड गाजतो’ – मनसेची टीका
- नाचता येईना अंगण वाकडे : भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
- ‘मुख्यमंत्र्यांचे राजीनामा मागणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याने पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती’


