Share

‘मुख्यमंत्र्यांचे राजीनामा मागणाऱ्या ‘त्या’  अधिकाऱ्याने पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती’

Published On: 

मुंबई   : .माजी नौदल अधिकारी  मदन शर्मा यांना  शिवसैनिकांनी  मारहाण केल्याचा प्रकार  समोर आला  होता. त्यानंतर  कोर्टाने   आरोपींना  मारहाण केल्याप्रकरणी  शर्मा यांनी ‘कायदा-सुव्यवस्थान संभाळणे जमत नसेल, तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी या अधिकाऱ्याने केली. त्यावर आज सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.

 
 
सामनचा अग्रलेख
 
चीनच्या सीमेवर 20 जवान शहीद झाले. त्यांच्या हत्येचा बदला अद्यापि घेतलेला नाही. चीनची अरेरावी कायम आहे. हे जे माजी नौदल अधिकारी आहेत, त्यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता या माजी नौदल अधिकाऱ्य़ाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यापुढे हे महाशय जी काही मागणी करतील ती करूद्यात, पण आपल्या सैनिकी पेशाला जागून त्यांनी 20 जवानांच्या हत्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, पण सध्या आपल्या देशात जो खुळचट, बुळचट प्रकार सुरू आहे तो पाहता ऑलिम्पिकमध्ये ‘पोरखेळ’ प्रकारात एखादे सुवर्णपदक हमखास मिळेल.
बईत मदन शर्मा नामक एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यावर संतप्त शिवसैनिकांनी हल्ला केला. याचे समर्थन कुणी करणार नाही. त्याचा निषेध व्हायलाच हवा. पण हेजे कोणी निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी राज्याचे लोकनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल माध्यमांवर फिरवून काय मिळवले. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कुणी शिकवले नव्हते काय? तुम्ही ज्या राज्यात राहता, कमावता, सुखाने जगता, त्या राज्यातील नेत्यांविषयी काही वेडेवाकडे बोलायचे व त्यावर संतापलेल्या कुणी तुमचे मुस्काट फोडले तर त्यास अन्याय, अत्याचार स्वातंत्र्यावर घाला, वगैरे शेलकी विशेषणे वापरून राजकारण करायचे, असा सवालही सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आले. तसेच भाजपाशासित राज्यात माजी सैनिकांवर झालेले हल्ले आणि भाजपा कार्यकर्त्यांनी माजी सैनिकांवर केलेले हल्ले यावरून भाजपाला टोला लगावला आहे.

 
महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!