मुंबई : ‘केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्याच्या आढावा घेण्यात तुम्ही कसले समाधान मानत आहात? तुमच्या मातोश्रीबाहेर न निघण्यामुळे कित्येक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे धैर्य खचले आहे. ठाऊक आहे का तुम्हाला? हे कधी समजणार हेच कळत नाही. त्यामुळे केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यापेक्षा प्रत्यक्ष फिरलात तर तुम्हाला राज्याच्या जनतेचे खरे प्रश्न कळतील अशी टीका भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
उद्धव ठाकरे हे घरातून काम करतात यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उत्तर दिले होते जिथे तुम्ही जाऊ शकत नाही, तिथे मी पोहचलो, दुर्गम भागात मी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला होता.यावर भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी प्रतियुत्तर देत मुख्यमंत्रीवर निशाणा साधला आहे
उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे किती रुग्णालय आणि कोविड सेंटरचे निरीक्षण केले? राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते जबाबदारी समजून राज्यभरातील रुग्णालयांमध्ये प्रवास करत आहेत. रुग्णांचे हाल जाणून घेत आहेत. प्रशासनाच्या, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि जनतेच्या मनी विश्वास निर्माण करत आहेत. मग तुम्ही मातोश्रीमध्ये बसल्या बसल्या किती कोविड सेंटरची परिस्थिती जाणून घेतली याचे उत्तर राज्यातील जनतेला द्यावे. तुमची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशी झाली आहे असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1305151909049688064?s=20
विरोधी पक्ष राजकारण करत आहे अअसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा आहे. मग कंगना राणौत विषय महाराष्ट्रात कोणी सुरु केला? तुम्हीच केला ना. सुशांत सिंग प्रकरणात एफआयआर दाखल करुन मुंबई पोलिसांनी जर योग्य चौकशी केली असती तर केंद्रीय तपास यंत्रणेला काहीच करावे लागले नसते. त्यामुळे आता तुम्हाला आपला मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे. मास्क लावल्यामुळेच कदाचित विरोधी पक्ष राजकारण करत असेल असे वाटत असेल पण त्यांनी मास्क बाजूला केल्यास वस्तूस्थिती समजू शकेल असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1305142107850457090?s=20
महत्वाच्या बातम्या
‘मुख्यमंत्र्यांचे राजीनामा मागणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याने पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती
दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिदला अटक
हा तर क्रिमीनल जस्टीसचा थट्टा करण्याचा प्रकार – पी चिदंबरम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

