Share

संसदेने भारतीय लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभं रहायला हवं-पंतप्रधान नरेंद्र मोदी

Published On: 

नवी दिल्ली: भारत आणि चीनचे संबंध सध्या तणावाचे असून सिमेवर सातत्याने संघर्ष होत आहे. दोन्ही देशातील सैनिक एकमेकांसमोर ठाकले आहेत. चीनची गुप्तचर यंत्रणा भारतातील काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांवर पाळत ठेऊन आहे, अशा काही बातम्या येत असताना आता भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेने भारतीय लष्कराच्या पाठिशी राहीलं पाहिजे असं अवाहन केले आहे. आपल्या देशाचे शूर जवान सिमारेषेवरील दुर्गम भागात शौर्याने लढत असून त्यांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे अस त्यांनी म्हटलं आहे.संसदेतील सर्वपक्षीय खासदारांनी एकमताने सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, या अधिवेशनात संसदेवर एक विशेष जबाबदारी आहे. आज आपल्या देशाचे वीर जवान सीमारेषेवरील दुर्गम भागात शौर्याने लढत आहेत. काही दिवसांनी या भागात बर्फवृष्टी सुरु होईल. मात्र, तरीही आपले सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी दुर्गम भागात पाय रोवून उभे आहेत. त्यामुळे संसदेतील सर्व खासदारांनी एकमताने भारतीय जवानांच्या पाठिशी उभा असल्याचा संदेश दिला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

याशिवाय, नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर लस येईपर्यंत कोणतीही ढिलाई बाळगून चालणार नाही, असेही सांगितले. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कोरोनाची लस लवकरात लवकर तयार व्हावी, याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत. आपले वैज्ञानिक सर्वांना या संकटातून बाहेर काढतील, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून भारत-चीन तणाव, बेरोजगारी, महागाई आणि कोरोना अशा मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरले जाण्याची शक्यता आहे. आज संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंडित जसराज, छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी, राज्यपाल लालजी टंडन, चेतन चौहान आणि माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह या दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर एका तासासाठी लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!