मुंबई : शिवसेनेने ठाकरे ब्रॅण्डवरून केलेल्या भाष्यावरून मनसेने सडकून टीका केली आहे. ‘कोणी घरी बसतो, कोणी उरी बसतो, कोणाचा बॅंड वाजतो, कोणाचा ब्रॅंड गाजतो!’ असं ट्वीट करत अमेय खोपकर यांनी संजय राऊतांना सणसणीत उत्तर दिलं आहे.
‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे.शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल’ अशी चिंताही राऊतांनी व्यक्त केली.यावर मनसेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1305334854511329280?s=20
‘विचार,संयम’ स्वाभिमान या मुळे ;ब्रॅण्ड मजबूत होत असतो. या उलट तडजोड, लाचारी यामुळे व्यवसाय तर होतो पण ब्रॅण्ड रसातळाला जातो’ अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. तर यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही जोरदार टीका केली आहे.
https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1305192631383633922?s=20
महत्वाच्या बातम्या
नाचता येईना अंगण वाकडे : भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
‘मुख्यमंत्र्यांचे राजीनामा मागणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याने पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती
दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिदला अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

