Share

Amol Mitkari | “घातपात झाला तर या सरकारला सोडणार नाही”; संशयास्पद बोटीवरून मिटकरींचा इशारा

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावरील समुद्रात एक संशयास्पद बोट सापडली आहे. या बोटीत तीन AK-47 आणि बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही बोट स्थानिक मच्छिमाराला दिसली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने बोट खेचून किनाऱ्यावर आणली आणि तपास सुरु केला. बोटीत एक मोठा बॉक्स होता, ज्यात तीन एके-47 आणि गोळ्या सापडल्या. त्यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे.

मिटकरी म्हणाले कि, “हिंदू धर्माचे मोठमोठे सण आले आहेत. त्यातच शत्रूकडून घातपात करण्याची हालचाल सुरु आहे. राज्यावर आणि कोकणावर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे आणि हेच या सरकारचं अपयश आहे. राज्य सरकार म्हणतंय कि पोलीस यंत्रणा सतर्क आहे पण पुलवामा हल्ल्याच्या आधीही केंद्र सरकार असंच म्हणत होतं. पण तरी नंतर पुलवामा हल्ला झाला. भंडाऱ्यातील घटना असेल किंवा आज सापडलेली संशयास्पद बोट असेल, यावरून आगामी हिंदू सणांवर हल्ला करण्याचा शत्रूचा प्रयत्न असेल आणि यात हे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे.”

पुढे ते असंही म्हणाले कि, “त्या बंदुकी कशा आल्या? येऊ घातलेल्या सणांच्या पार्श्वभूमीवर हा नियोजित कट असू शकतोय आणि जर सरकार त्याला छुप्या पद्धतीने मदत करत असेल तर यात काय या सरकारचं साटंलोटं आहे का? जर नसेल तर हे तपास यंत्रणाच अपयश आहे. हे मान्य केलं पाहिजे. हिंदुत्वाचा पुळका घेऊन सत्तेवर आलेल्यांनी आता हिंदूंचं रक्षण केलं पाहिजे. जर यात कोणाला घातपात किंवा दगाफटका झाला तर आम्ही सरकारला सोडणार नाही.”

तटकरे यांची मागणी

अदिती तटकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल पथक नेमण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच या घटनेनंतर स्थानिक लोकांची सुरक्षा महत्त्वाची झाली आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे येथे नागरिकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या घटनेची तातडीने एटीएसमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!