कोल्हापूर : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
दरम्यान, राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संभाव्य तिसरी लाट कधी येऊ शकते याबाबत सूतोवाच केलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं असून या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय.
पुढे ते म्हणाले, मागच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक १९ हजार रुग्ण होते. यावेळी २९ हजार रुग्ण गृहीत धरून तयारी करण्यात आली आहे. यासोबतच, १२ तालुक्यात लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू होणार आहे. तर जिल्ह्यात जिल्ह्यात ८० टक्के लसीकरण झाल्याचा दावा देखील त्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थावर ईडीची धाड
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या टीमकडून लूटमार सुरू-किरीट सोमय्या
- विजय वडेट्टीवार दारुच्या नशेत बोलतात का ? तुषार भोसलेंचा हल्लाबोल
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘मुख्यमंत्री स्वतः घरात बसले अन् देवांनाही डांबून ठेवले’; विखे-पाटलांची टीका


