Share

विजय वडेट्टीवार दारुच्या नशेत बोलतात का ? तुषार भोसलेंचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. राज्यातील बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. यामुळेच भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे.या पार्श्वभूमीवर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडी चे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.

या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन आता भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसेच शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यातल्या कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु असून भाजप नेत्यांकडून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरु करावीत अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन करणाऱ्या भाजपला सुनावले आहे. मंदिरं बंद करण्याचा निर्णय आमचा नाही. हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. आम्ही फक्त केंद्राच्या सूचनांचं पालन करत आहोत, असं सांगतानाच भाजपने शुद्धीत येऊन बोलावं, बेधुंद वक्तव्य करू नयेत, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपला सुनावले आहे.

दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपवर टीका केली आहे. ‘राज्यात सत्ता नसल्याने भाजप हा कासावीस झाला आहे. पाण्यातला मासा बाहेर निघतो आणि तडफडतो तशी भाजपची अवस्था झाली आहे. त्यामुळे ते काहीही प्रयत्न करताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीसांनी तर १५ ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचे काही देणंघेण नाही’, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

दरम्यान,या टीकेनंतर आचार्य तुषार भोसले यांनी पलटवार केला आहे. विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंमुळे ठाकरे सरकार हे निर्बुद्ध लोकांचं सरकार आहे, हे स्पष्ट झालंय असं भोसले म्हणाले आहेत. ज्या केंद्र सरकारच्या पत्राच्या आधारे कॉंग्रेसचे नेते जनतेची दिशाभूल करत आहेत त्या पत्रात फक्त सन आणि उत्सवांना गर्दी करू नका असं सांगितले आहे. मंदिरे बंद करा असं कुठेही सांगितले नाही असा दावा त्यांनी केला. देशभरातील मंदिरे सुरु आहेत फक्त महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांनी थोडा अभ्यास करावा असा सल्ला देखील दिला. पुढे बोलताना नाना पटोलेंपेक्षा पाचवीतला मुलगा हुशार आहे तसेच मंत्री विजय वडेट्टीवार दारुच्या नशेत बोलतात का ? असा खरमरीत सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!